संदीप कांबळे, कामठी
-काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली ऊर्जामंत्र्यांची भेट
कामठी ता प्र 3:- महावितरण कंपनीच्या ऊर्जा विभागाच्या वतीने १ एप्रिलपासून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना या कडाक्याच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो तर सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव व कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष शकूर नागानी, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस . अतीक कुरेशी यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांगितले की, पवित्र रमजान महिना 3 एप्रिलपासून सुरू होत असून शुभ नवरात्री 2 एप्रिलपासून सुरू झाली आहे. तेव्हा या पवित्र महिन्यात लोडशेंडिंग करण्यात येऊ नये यावर चर्चा केली.या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी रमजान आणि नवरात्रीच्या पवित्र महिन्यात लोडशेडिंग करू नये, असे आदेश ऊर्जा विभागाला दिले.
यावेळी गोपाल पट्टम, आशिष दीक्षित, वसीम खान, रवी गौर, मोहसीन अख्तर अन्सारी, वसीम कुरेशी, मो आबिद, इर्शाद मोल्डर, इझहर भाई, मुख्तार अन्सारी, जावेद कुरेशी उपस्थित होते.