संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकदारावर कार्यवाही करण्याचा महसूल प्रशासनाने एकच सपाटा सुरु केला असून काल कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वडोदा मार्गाने 4 ब्रास वाळू वाहतूक परवानाच्या नावावर 6 ब्रास वाळू वाहून नेत असता ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक क्र एम एच 40 एन 0565 च्या चालकाला ताब्यात घेत पुढील कार्यवाहिस्तव ओव्हरलोड वाळू वाहतुक करणारा सदर ट्रक मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.
ही कार्यवाही गतपहाटे साडे तीन दरम्यान केली असून ही यशस्वी कार्यवाही तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ नायब तहसीलदार अमर हांडा, तलाठी एन डी फुलझेले, तलाठी पी पी अगत, वाहनचालक युवराज चौधरी यानो केली.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)