संदीप कांबळे, कामठी
कलश यात्रेने कामठी शहर दुमदुमले स्लग:- कलश यात्रेचे ठिकाणी भव्य स्वागत व प्रसादाचे वितरण
कामठी ता प्र 20:- देवभूमी उत्तराखंड गायत्री चेतना केंद्र शांतिकुंज हरिद्वार अखिल विश्व गायत्री परिवारा वतीने कामठी येथे आयोजित स्वास्थ संवर्धन 108 कुंडली गायत्री महायज्ञा ची सुरुवात भव्य कलश यात्रा ने करण्यात आली कामठी काढण्यात आलेल्या या भव्य कलश यात्रेचे नागरिकांनी ठीकठिकाणी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. शांतिकुंज हरिद्वार अखिल विश्व गायत्री परिवार च्या वतीने परम श्रद्धेय डॉ प्रणव पंड्या , वंदनीय शैल जीजी यांच्या मार्गदर्शनात राम लक्ष्मीनगर आशा हॉस्पिटलच्या मागे नागपूर कामठी रोडवर आयोजित स्वास्थ संवर्धन 108 कुंडली गायत्री माहायज्ञाचे आयोजन 20 मार्च ते 23 मार्च पर्यंत करण्यात आले असून स्वास्थ संवर्धन 108 कुंडलिया गायत्री माहायज्ञाची सुरुवात कामठी गांधी चौक कामठी येथील गायत्री परिवाराचे वतीने सजविलेल्या रथावरील कलशची पूजा आरती करून कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली .
कलश यात्रा गांधी चौक ,पोरवाल चौक, सत्यनारायण चौक, अग्रवाल भवन चौक, फुलवाडी चौक ,लालाओली चौक, बोरकर चौक ,नेताजी चौक ,मेन रोड, पोलीस स्टेशन जुनी कामठी , मोटर स्टँड चौक ,जयस्तंभ चौक गंज के बालाजी मंदिर, पोलीसलाईन चौक ,वारिस पुरा चौक, एसबोआय बँक चौक, गरुड चौक ,गिरजाघर चौक ,कल्पतरू कॉलनी चौक, आशा हॉस्पिटल चौक मार्गे नगर भ्रमण करीत राम लक्ष्मीनगर आशा हॉस्पिटल मागील महायज्ञ स्थळी कलश यात्रेचे समापन करण्यात आले. कलश यात्रेचे ठिकाणी स्वागत करून प्रसादाचे वितरण करण्यात आले .
दरम्यान ठीकठिकाणी नागरिकांनी कलश यात्रेचे स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. कलश यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जुनी कामठीचे पोलीस निरीक्षक राहुल शिंरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आकाश माकने सह पोलीस पथक तसेच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे सह पोलीस पथक यांनीं मोठ्या प्रमाणात कडक पोलिस बंदोबस्त लावला होता. 20 ते 23 मार्च पर्यंत चालणार या तीन दिवसीय 108 कुंडली गायत्री महायुदनात,प्रतिदिन प्रज्ञा योग,प्राणायाम देव आव्हान यज्ञा आवडती महिलामकथक जागरण संगित्मय गोष्टी आयुर्वेद निसर्गोपचार ,वैकल्पिक चिकित्सा सोबतच दिनांक 22 मार्चला विराट व संवर्धन यज्ञ प्रसंगी डॉ चिन्मय पडया कुलपती देवा सी एस विद्यालय हरिदार.हे मार्गदर्शन करणार आहेत .108 कुंडली गायत्री महायज्ञात लाखो संख्येने भाविक भक्त सहभागी झालेले आहेत.