संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्रीलंकेमध्ये आयोजित जुडो कराटे स्पर्धेत एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी जान्हवी प्रणय मेश्रामने अंडर १९ मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव लौकीक केले. या यशाबद्दल पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय चव्हाण उपप्राचार्य डॉक्टर सुधीर अग्रवाल पर्यवेक्षक व्ही बी.वंजारी, क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका मल्लिका नागपुरे आणि शिक्षक वृंदांनी जान्हवी मेश्राम चे अभिनंदन केले आहे. श्रीलंकेतील कोलंबो स्थित सुगतदासा आंतरराष्ट्रीय इंदोर स्टेडियम मध्ये कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या २५ व्या निप्पॉन आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यात रवींद्र चानोरे, भूषण यादव भक्ते, प्रवेश जांभुळकर, उमंग टेंबरे, विहान वाहने,तनिषा शिपाही,विद्या दहाटे,विनोद दहाटे, सौम्य आंबादे, अर्णव जांभुळकर, रुचिका हटकर, जानवी मेश्राम, अक्षरा वासनिक,येशिका श्रीवास आणि लाभश्री गवई यांचा समावेश होता.