नागपूर :- पोलीस ठाणे ईमामबाडा हद्दीत प्लॉट नं. ६२, साऊथ पॉईन्ट शाळेच्या मागे, वकीलपेठ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विलास वासुदेव समरोत (समर्थ), वय ४० वर्ग, हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह विडीपेठ येथे लग्नाचे कार्यक्रमाला गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन आत प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातुन सोन्या-चांदीचे दागिने व रोख १,५५,०००/- रू. असा एकुण १,७६,०००/- रु चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे ईमामवाडा येथे सफी, राजेश भोंगाडे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.