नागपूर :-पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत प्लॉट नं. २१, भैव्यालाल वाडी, राजिव नगर, वर्धा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे बाळु नानाजी रामटेके वय ५२ वर्ष यांचे कडे यार बाकी वाहन निशान मॅगनेट क. एम. एच ३१ एफ.आर ६९०१ हे आहे. आरोपी क. १) अमोल विक्रम गजभिये वय २४ वर्ष रा. पिंपरी, वार्ड नं. २ मोहल्ला, कन्हान, पारशिवनी जि. नागपूर याने दिनांक ०४.१०.२०२४ चे ०९.०० वा. ने सुमारास झूम अँप वरून फिर्यादीनी वर नमुद गाडी किरायाने घेतली परंतु किरायाने घेतलेली गाडी वेळेवर फिर्यादीस परत न करता, स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता फिर्यादीचा विश्वासघात करून गाड़ी आरोपी क. २) शेख अशपाक वल्द शेख ईमान वय २९ वर्ष रा. पिवळी नदी जवळ, नागपूर ३) पिरखान वल्द वहीद खान वय ३४ वर्ष रा. वार्ड क. ३, लखनादौन, जि. शिवनी, मध्य प्रदेश ४) मोवीन अहमद उर्फ चाबा वय ४५ वर्ष रा. टिपू सुलतान चौक, यशोधरानगर, नागपूर यांना किरायाने दिली, व फिर्यादीची गाडी परत केली नाही.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक ०७.१२.२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सोनेगाव येथे पोउपनि, सूर्यवंशी यांनी आरोपीविरूध्द कलम ३१६(२), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क. २ व ३ यांना ताब्यात घेतले आहे, त्यांचे कडुन गुन्हयातील वाहन किंमती अंदाजे ३,००,०००/- रू. चे जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.