विधानभवन परिसरात 50 वे सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शन

नागपूर :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्यान शाखेमार्फत 25 व 26 जानेवारी 2025 रोजी विधानभवन परिसरात 50 व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या पुष्प प्रदर्शनात गुलाब व हंगामी फुले, कॅक्‌टस, सक्कुले, शोभिवंत फुलझाडांच्या कुंड्या, पुष्परचना प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शनात पुष्प्‍ स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी सहायक संचालक उपवने व उद्याने, बांधकाम संकुल, बंगलो क्र.39/1 , लेडीज क्लब समोर, सिव्हील लाईन, नागपूर या कार्यालयात अथवा 0712-256125 या क्रमांकावर संपर्क साधन्याचे आवाहन, सहायक संचालक उपवने व उद्याने प्रसाद कडुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेचा शुभारंभ

Fri Dec 6 , 2024
– जागतिक क्षयरोग दिनापर्यंत चालणार मोहिम नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ (जागतिक क्षयरोग दिन) पर्यंत राबविण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com