नागपूर :- पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत प्रशॉट नं. २७६, साईकृपा अपार्टमेंट, फ्लॅट नं. ४०१, राठोड ले-आऊट, अनंत नगर, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी प्रिती चारूदत्त कांबळे, वय ५२ वर्षे ह्या आपले राहते घराला कुरुप लावुन परिवारासह कामानिमीत्त बँकेत गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, बेडरूम मधील लोखंडी आलमारीत ठेवलेले रोख ४,५०,०००/-रु. व सोन्या-डायमंडचे दागीने असा एकूण ८,५१,०००/- रू. या मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली. तसेच, गुन्ह्याची पध्दत व गुप्त बातमीदार नेमुन रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असता, मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून सापळा रचुन रेकॉर्डवरील आरोपी नामे रोशन सेवकदास मेश्राम, वय ४१ वर्षे, रा. आयविएम रोड, गिट्टीखदान, नागपुर यांस ताब्यात घेतले. आरोपीची विचारपुस केली असता, आरोपीने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने बजनी २५९ ग्रॅम किंमती १८,१३,०००/- व रोख ४,००,०००/-रू, लोखंडी रॉड व गुन्ह्यात वापरलेली ज्युपीटर दुचाकी असा एकुण २२,८३,६००/-रु. चा मुद्देमाल जप्त केला. आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी गिट्टीखदान पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर,संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सुधीर नंदनवार सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शानाखाली, पोनि. रविंद्र नाईकवाड, पोहवा, श्रीकांत उईके, प्रशांत गभणे, प्रविण रोडे, पोअं. निलेश श्रीपात्रे, सुधीर सौधरकर, आशिष वानखेडे, सुधीर पवार व मपोहवा लता गवई यांनी केली.