कन्हान :- वेकोलि खुली कोळसा खदान कामठी उप क्षेत्र अंतर्गत कार्यरत खाजगी सुरक्षा रक्षक परिसरात पेट्रोलिंग करित असताना त्यातील वाईल्ड वेल्फेयर सोसायटी कन्हानचा सदस्य आशिष मेश्राम याच्या लक्षात आले की, परिसरात गिधड हा मोठा पक्षी आहे . त्यानी आपल्या सहकार्याच्या मदतीने त्या मोठया पक्षाला पकडुन वन विभागाच्या सहकार्याने टीटी सेंटर नागपुर हयांच्या स्वाधिन करून लुप्त होत असलेल्या गीधड पक्षाला दिले जीवनदान.
गुरुवार (दि.२८) नोहेंबर २०२४ ला रात्री १० वाजता दरम्यान वेकोलि खुली कोळसा खदान कामठी उपक्षेत्र परिसरात सब स्टेशन जवळ वेकोलि खाजगी सुरक्षा रक्षक पेट्रोलिंग करताना एक मोठा विशालकाय पक्षी त्यांच्या निदर्शनात आला, तेव्हा तिथे पेट्रोलिंग रक्षका मध्ये एक वाईल्ड वेल्फेयर सोसायटी कन्हानचा सदस्य आशिष मेश्राम वेकोलि मध्ये खाजगी सुरक्षा रक्षक म्हणुन काम करित असल्याने त्यांनी त्या पक्ष्या ला ओळखले आणि आपल्या टीम च्या पूर्ण सदस्यांना सांगितले की, या क्षेत्रा मध्ये एक मोठा गिधड पक्षी आहे. वेळ न गमावता सदस्य लगेच कोळसा खदान परिसरात पोहोचले तिथे त्याना एक मोठे गीधड़ पक्षी दिसला. आणि त्याच्या शरीराला ट्रैकर लागले असल्या ने लगेच त्यानी वनविभाला संपर्क साधुन ही माहिती त्याना दिली. गीधड़ हे कोळसा खुली खदान मध्ये जाऊन अपघात होऊ शकते व तिथे तो मृत्यु मुखी सुध्दा पडु शकतो, अशी आशंका बाळगता सदस्यानी त्याला सुखरूप रित्या पकड़ले व वनविभागाच्या मार्फ़त त्याला ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर नागपुर याच्या सुपुर्द करून लुप्त होत असलेल्या गीधड पक्षा ला दिले जीवनदान. याप्रसंगी वाइल्ड लाइफ वेलफ़ेयर सोसाय टी कन्हान चे चंद्रशेखर बोरकर, आशिष मेश्राम, बबलू मूलुंडे तसेच वन विभाग व टी टी सेंटर आणि प्राणी मित्र रोहित फ़रकसे, गुड्डू नेहाल, अंकेश, दीपक, गोपाल बिसेन, मनिष नंदेश्वर, प्रवेश डोंगरे हे सुध्दा प्रामुख्याने उपस्थित होते.