– पोलीस विभागाने बूथ तपासणीसाठी केली पोलीस हवालदाराची नियुक्ती, पोलीस हवालदार मनोज जयस्वाल यांची मतदान बूथवर प्रेस कार्ड दाखवूनही पत्रकारासोबत अभद्र वागणूक
कोदामेंढी :- येथील एकूण 3829 लोकसंख्येपैकी 3057 मतदार आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार ला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाच्या हक्क बजाविणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेहमीप्रमाणे येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय 160, 161 व162 असे एकूण तीन बूथ असून ,बुथ क्रमांक 160 मध्ये पुरुष 568, स्त्रिया 586 बूथ क्रमांक 161 मध्ये पुरुष 536 स्त्रिया 566 बुथ क्रमांक 162 मध्ये पुरुष 380 स्त्रिया 401 असे एकूण पुरुष 1504 व एकूण स्त्रिया 1553 मतदार असून ,महिला मतदार असलेल्या शासनाच्या लाडक्या बहिणींची पुरुष मतदारांपेक्षा 51 जास्त आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी कोणत्या उमेदवाराची बटन दाबतात. त्यावर उमेदवाराच्या जय पराजय अवलंबून असण्याची दाट शक्यता राजकीय जाणकार वर्तवित आहेत.
मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान अधिकारी वर्ग व पोलीस प्रशासन वर्ग आज कोदामेंढीतील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दाखल झाले असून सायंकाळी साडेपाच दरम्यान भेट दिली असता प्रत्येक बुथवर एक महिला पोलीस शिपाई व एक होमगार्ड तैनात राहणार असल्याचे 160 ची महिला शिपाई भारती बावणे( क्र. 317) होमगार्ड आर चीकलोंढे यांनी सांगितले .161 व 162 चे पोलीस शिपाई व होमगार्ड नाव विचारले असता, खिशात लावलेल्या आपल्या नावाची बिल्ला लपवित होते, व नाव सांगण्यास नकार देत होते. त्यामुळे इथं नियुक्त पोलीस शिपाई, होमगार्ड मध्ये गडबड तर नाही ना ? या शंकेला पेव फुटत आहे . मतदान अधिकारीही प्रेस कार्ड दाखवल्यानंतरही नाव सांगण्यास व बुथ इमारतीची फोटो घेण्यास मनाई करत होते. आमची नावे कामठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा कामठी- मौदा उपविभागीय अधिकारी गोस्वामी यांना विचारा असे ते सांगत होते .उपविभागीय अधिकारी गोस्वामी यांना भ्रमणध्वनी केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही .पोलीस प्रशासन विभागाने नागपूर ग्रामीणचे पोलीस हवालदार मनोज जयस्वाल यांची येथील तपासणीसाठी नियुक्ती केल्याने ते तपासणीसाठी आले असता सदर वार्ताहरला माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते व इतरां चीही माहिती घेण्यास मज्जाव करत होते. येथून वारंवार लवकर निघून जा , लवकर निघून जा,असे म्हणून त्यांच्यासोबत अभद्र वागणूक करत होते. पोलीस प्रशासनाकडे असलेल्या पोलीस मनुष्यबळाप्रमाणे प्रत्येक बुथवर पोलीस शिपाई व होमगार्ड ची नियुक्ती केल्याची माहिती जयस्वाल यांनी घाई घाईने दिली.
नेहमीप्रमाणे बूथ क्रमांक 160 , 161,162 च्या येथील बीएलओ अनुक्रमे सूर्यकांता बावनकुळे, माधुरी बावनकुळे, दुर्गा ढोमणे मतदारांच्या मदतीसाठी दिवसभर आपापल्या बुधवर संबंधित मतदार यादी घेऊन उपस्थित असतात हे विशेष!