निवडणूक निरीक्षक गुप्ता यांची तुमसर येथे भेट व मार्गदर्शन

भंडारा :- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 चे पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरीक्षक विजयकुमार गुप्ता यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी,60-तुमसर यांचे कार्यालयात आज उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत दर्शन निकाळजे, निवडणूक निर्णय अधिकारी, 60-तुमसर, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, मोहन टिकले, तहसीलदार तुमसर, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, संदिप माकोडे, तहसीलदार मोहाडी, संपर्क अधिकारी प्रफुल्ल र.केळकर, बी.एस.पेंदाम, नायब तहसीलदार (निवडणूक),तुमसर आणि उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक निरीक्षक यांनी उमेदवारांना निवडणूक प्रकियेबाबत महत्वपूर्ण सूचना आणि मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि पारदर्शक पध्दतीने पार पाडण्याच्या दृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

निवडणूक प्रचारादरम्यान सभा,प्रचार आणि प्रसिध्दी यासारख्या सर्व उपक्रमांसाठी प्रशासनाची परवागी घेणे आवश्यक आहे, असे मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी स्पष्ट केले. यासाठी वेळेवर अर्ज करणे व आवश्यक असलेल्या परवानग्या प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रचारादरम्यान नियमांचे पालन करुन कोणत्याही प्रकारची अनुशासनबाहय कृती टाळावी, खर्चाचा दैनंदिन हिशोब दररोज सादर करावा, आयोगाने निश्चित करुन दिल्यानुसार उमेदवार / प्रतिनिधी यांनी काय करावे आणि काय करु नये या नियमाचे पालन करावे, तसेच छपाई करण्यात येणारे पत्रकांवर प्रिटींग प्रेसचे नाव, संख्या प्रकाशक ई.ची नोंद करावी, असे त्यांनी उमेदवार आणि प्रतिनिधींना सांगीतले. निवडणूकीशी निगडीत कोणत्याही प्रकारचे प्रश्न किंवा समस्या उद्भवल्यास निवडणूक निर्णय अधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षकांनी केले. यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत, तसेच शंका आणि प्रश्न तात्काळ निराकरण करता येतील. तुमसर विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडावी. आणि विधानसभा निवडणूकीत शांतता आणि सुशासनासाठी सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. तसेच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी निवडणूक विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनाचे पालन करावे. असे निवडणूक निरिक्षक विजयकुमार गुप्ता यांनी आवाहन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जातीजमातीमध्ये संघर्ष घडविण्याचा काँग्रेस आघाडीचा कट हाणून पाडा - धुळे येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

Fri Nov 8 , 2024
धुळे :- देशातील जातीजातींमध्ये संघर्ष पेरण्याचा धोकादायक कट काँग्रेस व महाविकास आघाडीने रचला असून त्यापासून महाराष्ट्राने व देशाने सावध रहावे, असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी धुळे येथे महायुतीच्या प्रचाराकरिता आयोजित विशाल जाहीर सभेत बोलताना दिला. काँग्रेस व त्यांच्या साथीदारांच्या या कटापासून जनतेला सावध करणे हे माझे कर्तव्य आहे,असे सांगून,स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत जातीजमातींमध्ये संघर्ष रुजविण्याचेच काम केले, असा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com