राजधानीत सरदार पटेल यांची जयंती साजरी आणि इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनी अभिवादन

नवी दिल्ली :- देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव श्री. रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांना राष्ट्राची एकात्मता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल जयंती साजरी इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनी अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली व इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपसंचालक (माहिती ) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maha Governor applauds Young Mountaineering Prodigy

Fri Nov 1 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor C P Radhakrishnan congratulated Kaamya Karthikeyan, the 16 year old mountaineering prodigy, who recently became India’s youngest and the world’s second youngest to scale Mount Everest from Nepal. Kaamya, a class XII student at Navy Children School, accompanied by her father Cdr S Karthikeyan and mother Lavanya met the Governor at Raj Bhavan Mumbai on Wed […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com