नागपूर :- गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना, ग्राम पंचायत भिलगाव, कमानी जवळ एक संशयीत ईसम वय अंदाजे २४ ते २५ वर्ष वयाचा हा संशयीतरित्या वावरतांना दिसुन आल्याने, त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सय्यद जीशान सय्यद रिजवान हैदर रिझवी वय २४ वर्ष, रा. बकरा तवेला, जुना भोईपूरा, सैलानी नगर, जुनी कामठी, नागपूर असे सांगीतले. त्याची व त्याचे जवळ असलेल्या वाहनाची कायदेशीररित्या झडती घेतली असता, त्याचे जवळील नंबर प्लेट नसलेल्या टि.व्ही.एस ज्युपीटर वाहनामध्ये ३ किलो ३० ग्रॅम गांजा किंमती ६०,६००/- रू. चा मिळुन आला. आरोपीचे ताब्यातुन गांजा, मोपेड वाहन असा एकुण १,६०,६००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे हे कृत्य कलम ८ (क), २०(ब), २ (ब), एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे यशोधरानगर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई कामी यशोधरानगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे मपोनी. ललीता तोडासे, सपोनि मनोज घुरडे, पोहता मनोज नेवारे, विजय यादव, पवन गजभिये, शैलेय डोबोले, मपोहवा, अनुप यादव, नापोअं, गणेश जोगेकर, अरविंद गेडेकर, पोअं, सुभाष गजभिये, रोहीत काळे, राहुल पाटील यांनी केली.