चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :-फिर्यादी गोपाल ग्यानीलाल राहंगडाले वय ७१ वर्ष रा. राजे दहेगाव, स्वाती सितारामदास महाजन मंदीर समोर, जवाहर नगर, भंडारा यांचा मुलगा नामे विशांत रहांगडाले यांचे घराचे वास्तु पुजन असल्याने ते जयंती नगरी, बेसा रोड, नागपूर येथे आले होते. दिनांक १६.१०.२०२४ चे ०८.०० वा. ने सुमारास, पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीतून मुख्य बस स्थानक येथुन फिर्यादी व त्यांची पत्नी हे दोघे नागपूर ते तुमसर जाणाण्या एसटी बस मध्ये चढ़त असतांना, फिर्यादीचे मागे असलेल्या एक अनोळखी आरोपी ईसमाने ‘तुम्हास मदत करू काय’ असे म्हणुन गर्दीचा फायदा घेवुन व फिर्यादीची नजर चुकावुन फिर्यादी जवळील बॅगमधील पर्स ज्यात सोन्या-चांदीचे दागिने व रोख १,००,०००/-, व बैंक एटीएम कार्ड असलेली एकुण किंमती अंदाजे ३,०४,८४०/- रू. मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे पोउपनि. सोनवने यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार मारणाऱ्या आरोपीस अटक

Fri Oct 18 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे वाडी हद्दीत प्लॉट नं. ४६, त्रिलोक नगर, लोकमान्य शाळे जवळ, दत्तवाडी, वाडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी यश सुभाष बोरकर वय २५ वर्ष यांचे वडील नामे सुभाष गुलाब बोरकर वय ५५ वर्ष हे पोलीस ठाणे वाडी हद्दीत गडगाव रोड, डि.टी.डी. एस, कंपनीचे गोडावून समोर पानठेला चालवितात. दिनांक १५.१०.२०२४ चे १७. ३० वा. ते दि. १६.१०.२०२४ से १५.३० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com