जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ :- जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा तालुका घाटंजी येथे सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम असलेल्या वर्ग 9 वी तील रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता मागविण्यात येत आहेत.

विद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा ता. घाटंजी तसेच आवश्यकता असल्यास अन्य परीक्षा केंद्रावर होणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज https://cbseitms.nic.in/२०२४/nvsix व www.jnvyavatmal.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर आहे. परीक्षेकरिता लागणारी विस्तारीत माहिती वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2024-2025 मध्ये इयत्ता 8 वी मध्ये शिकत असावा तसेच तो यवतमाळ जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेचाच विद्यार्थी असावा. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी इयत्ता 8 वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, असे विद्यार्थी परीक्षेकरीता पात्र नाही.

ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता इयत्ता 9 वी मध्ये जवाहर नवोदय विद्यालयात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचे आहे, त्या विद्यार्थ्यांचा रहिवासी जिल्हा आणि इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेला जिल्हा हा एकच असावा व तो त्याच जिल्ह्यात प्रवेश अर्ज करू शकतो.

विद्यार्थ्यांचा जन्म दि 1 मे 2021 ते 31 जुलै 2012 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. (दोन्ही दिवस धरून) ही अट सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागु आहे. अधिक माहितीसाठी https://cbseitms.nic.in/२०२४/nvsix व www.jnvyavatmal.com या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तुली की महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी में गैर सरकारी सदस्य के रूप नियुक्ती

Wed Oct 16 , 2024
नागपूर :-विदर्भ के 13 व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स के डायरेक्टर व सहसचिव  राजवंतपाल सिंग तुली की महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी में विदर्भ से गैर सरकारी सदस्य कें रूप नियुक्ती पर चेंबर के अध्यक्ष अर्जुनदास आहुजा ने चेंबर के सर्वश्री उपाध्यक्ष- फारूक अकबानी, स्वप्निल अहिरकर, सचिव – सचिन पुनियानी, सहसचिव – शब्बार शाकिर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com