मंदीरातुन चोरी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ०३ गुन्हे उघडकीस 

नागपूर :- पोलीस ठाणे कळमणा हद्दीत प्लॉट नं. ३९४, पुर्व सुर्यनगर, पाण्याचे टाकी जवळील, साई मंदीर येथील मंदीराचे दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून आरोपी एक २० ते २२ वर्ष वयाचा ईसम व एक सलवासुट घातलेली ४० ते ४२ वर्ष वयाची महिला यांनी मंदीरातील तिन फुट ऊंचीच्या ०२ नग पितळी समया, एक पंचआरती, व ०४ नग पितळी टाळ असा एकुण ९,२००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी अनिल विठ्ठलराव वंजारी वय ५४ वर्ग रा. लॉट नं. ३८५, सुर्यनगर, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (ड) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपासावरून आरोपी नामे १) ईरफान अंसारी शमशाद अंसारी, वय २३ वर्षे, रा. लाल शाळे जवळ, भांडेवाडी, पारडी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने त्याची महिला साथिदार पाहिजे आरोपी नामे २) नैना मेश्राम रा. ताजबाग, नागपूर हिचेसह संगणमत करून त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीला अधिक विचारपूस केली असता, त्याने वरिल गुन्हया व्यतीरिक्त पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत मंदीरातुन चोरी तसेच पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतुन स्प्लेंडर क. एम. एच ४० ए.एफ ७१४० किंमती ५५,०००/- रू. ची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन दोन्ही मंदीरातील चोरी केलेला संपुर्ण मुद्देमाल, दुचाकी वाहन सलेंडर क. एम.एच ४० ए.एफ ७१४० असा एकुण किंमती अंदाजे १,००,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपी क. १ यास मुद्देमालसह पुढील कारवाई करीता कळमणा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर,  संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर,   राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि. मधुकर काठोके, सफौ. दशरथ मिश्रा, पोहवा. विजय श्रीवास, भुषन भगत, संतोषसिंग ठाकुर, पोअं. जितेश रेड्डी, दिपक दासरवार, कपिलकुमार तांडकर, दिपक लाकडे, विशाल रोकडे व प्रमोद देशभ्रतार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस

Wed Oct 16 , 2024
नागपूर:- फिर्यादी योगश ओमकार कोडवते, वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं. १४२, गणेश नगर, दाभा, गि‌ट्टीखदान, नागपूर यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क. एम.एच. ३१ एफ. व्ही ३३१२ किंमती २०,०००/-रू, ची पोलीस ठाणे गिट्टीखदान हहीत, जाफर नगर हॉकी ग्राऊंड, प्लॉट नं. १२३, येथे भावाचे घरासमोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com