काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवा – कुणाल राऊत

युवक काँग्रेसच्या तीन दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन
नागपुर – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय तीन दिवसीय निवासी कार्यशाळेत होणारे विचारमंथन आणि उद्बोधनाच्या आधारावर जोमाने काम करून काँग्रेसला “क्रमांक एक”चा पक्ष बनवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.
नागपूर जिल्ह्याच्या  सिल्लारी पेंच येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित “लक्ष्य २०२२” या तीन दिवसीय निवासी शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही श्रीनिवास यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे सीताराम लांबा, हरपाल सिंग, प्रियंका सानप, भैयाजी पवार, नागपूर मनपा विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे,  प्रफुल गुडधे पाटील, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शरण पाटील, अनिकेत म्हात्रे, सोनललक्ष्मी घाग सह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गांजा तस्करीचा प्रयत्न फसला

Tue May 10 , 2022
-30 किलो अंमलीपदार्थ  जप्त -समता एक्सप्रेसमध्ये पहाटेची कारवाई नागपूर –  कर्तव्यदक्ष पोलिसांनी गांजा तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, आरोपी मिळू शकले नाही. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास समता एक्सप्रेसमध्ये करण्यात आली. झाडाझडती दरम्यान 30 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त करून अज्ञात तस्कराविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. विशाखापट्टनम ते दिल्ली ला जाणारी 12807 समता एक्सप्रेसने मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights