हद्दपार ईसमास शस्त्रासह अटक

नागपूर :- जरीपटका पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, लुबीनी नगर, अंगुलीमाल बौध्द विहार जवळ, एक इसम घातक शस्त्रासह ऊभा आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी मिळालेल्या वर्णनाचा ईसम दिसल्याने त्यास बोलाविले असता, तो पळु लागला त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेमध्ये अॅल्युमीनीयमची मुठ असलेली लोखंडी धारदार गुप्ती मिळुन आल्याने ताब्यात घेतली. त्यास त्योच नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव हरीराम सोनटक्के वय २५ वर्ष रा. लुबीनी नगर, जरीपटका, नागपूर असे सांगीतले. आरोपीचा अभिलेख तपासला असता त्यास पोलीस ठाणे जरीपटका येथुन मा. पोलीस उप आयुक्त परि. क. ५ यांनी त्यांचे आदेश क. ११/२०२४ नुसार तामीली दिनांक २५.०६.२०२४ रोजी पासुन ०६ महिन्या करीता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतुन हरपार केल्याचे दिसुन आले. आरोपी हा विनापरवाना शस्त्रासह नागपूर शहर हद्दीत मिळुन आल्याने, त्याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याने ताब्यात घेतले.

याप्रकरणी फिर्यादी पोअं. आनंद जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे पोउपनि, खोमणे  यांनी आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह. का, सहकलम कलम १४२, १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास संरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंदीरातुन चोरी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ०३ गुन्हे उघडकीस 

Wed Oct 16 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे कळमणा हद्दीत प्लॉट नं. ३९४, पुर्व सुर्यनगर, पाण्याचे टाकी जवळील, साई मंदीर येथील मंदीराचे दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून आरोपी एक २० ते २२ वर्ष वयाचा ईसम व एक सलवासुट घातलेली ४० ते ४२ वर्ष वयाची महिला यांनी मंदीरातील तिन फुट ऊंचीच्या ०२ नग पितळी समया, एक पंचआरती, व ०४ नग पितळी टाळ असा एकुण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com