राजधानीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

नवी दिल्ली :- भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

परिचय केंद्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य - सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या भावना

Wed Oct 16 , 2024
– बाबूपेठ उड्डाणपुलाचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल’ नामकरण – समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची दिली ग्वाही चंद्रपूर :- भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोंच्या समुदायाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. शोषित, वंचितांचा आवाज बुलंद केला. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन संघटीत भावनेने कार्य करावे. आज उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले, हे माझेच भाग्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com