विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे कामठी शहराचे नाव जगाच्या नकाशावर कोरले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे उसळला भीमसागर

– 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 68 मीटर पंचशील ध्वजाने बाबासाहेबांना सलामी

कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल जागतिक शांतीचे प्रतीक असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लाखोंच्या संख्येतील अनुयायी तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठी आले होते.दरवर्षी प्रमाने यावर्षी अनुयायांची गर्दी ही वाढीव संख्येतील आहे.दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत करीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती शिल्प म्हणून जगप्रसिद्ध झाले तर जगप्रसिद्ध विश्वविख्यात या ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे नागपूर जिल्ह्यातील कामठी शहराचे नाव जगाच्या नकाशावर कोरल्या गेले हे आपल्या सर्वसाठी गौरवास्पद असल्याचे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला दिलेल्या सदिच्छा भेटीत व्यक्त केले.याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख माजी राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती व अगरबत्ती लावून वंदन केले तसेच परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेत जॅपनीस पद्धतीची चॅटिंग करण्यात आली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लाखोंच्या संख्येत जनसागर उसळला होता.काल सकाळी साडे दहा वाजता माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत उपस्थित अनुयायांसह विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली .तदनंतर 68 मीटर च्या धम्मध्वजानी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आली.

दरम्यानड्रॅगन पॅलेस टेम्पल ते ड्रॅगन पॅलेस कॅम्पस परिसरात असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील राजश्री थाटात बसलेल्या परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत 68 मीटर ची धम्मध्वज शांती मार्च काढण्यात आली या शांती मार्च वेळी सहभागी भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो, जयभीम च्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.तर उल्लेखनीय आहे की 68 मीटर चा हा धम्मध्वज श्रीलंका येथून मागविण्यात आला होता हे इथं विशेष!

तहान,भूक ,रोजी रोटी, गावगाडे सर्व काही मागे ठेवून फक्त भीमाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो शेकडो किलोमीटर अंतर ओलांडून आलेला भीमसागर ड्रॅगन पॅलेस टेम्पल व डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उसळला होता.देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनी आंबेडकरी अनु यायांनी नागपूरच्या दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला सुद्धा भेट दिली.यावर्षी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देणाऱ्या अनुयायांची संख्या ही 12 लाखाहून अधिक असल्याची सूत्रांनी माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोककल्याणासाठी असलेला निधी लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवू  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mon Oct 14 , 2024
– पारशिवनी येथे सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन  नागपूर :- लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. याची सुरुवात आम्ही अन्नदात्या शेतकऱ्यांपासून केली. केंद्रसारकारचे सहा हजार व महाराष्ट्र शासनाचे सहा हजार असे आपण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सावरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील वृद्ध व्यक्तींना आधार देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना आपण साकारली. लाडक्या बहिणींची योजना आणली. आपल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com