यवतमाळ :- महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे शासकीय विश्राम भवन यवतमाळ येथे आगमण झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॉ. अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तत्पुर्वी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना मानवंदना देण्यात आली.