धम्मदीक्षेसाठी अनुयायी निघाले नागपूरच्या दिशेने

– भदंत ससाई देणार धम्मदीक्षा

– जापानाहून येणार चाळीस अनुयानी

– आजपासून तीन दिवस कार्यक्रम 

नागपूर :- दरवर्षी प्रमाणे यंदाही पवित्र दीक्षाभूमिवर धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १० ते १२ ऑक्टोबर पर्यंत सलग तीन दिवस चालणार्‍या कार्यक्रमात भिक्खू संघ उपासक, अनुयायी व श्रामणेर यांना दीक्षा देतील. पहिल्या दिवशी म्हणजे गुरूवारी सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमिचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदन्त आर्य सुरई ससाई बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करून उपासकांना दीक्षा देतील. दरम्यान उपासकांना धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरित होईल.

कार्यक्रमाला भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते नागवंश, भंते महानागा, भंते धम्मप्रकाश, भंते धम्मविजय, भंते नागवंश एस., भंते भीमा बोधी, धम्मशीला उपस्थित राहतील. एतिहासिक घटनेचे महत्व असलेल्या दीक्षाभूमीवर दरवर्षी विविध राज्यातील हजारो उपासक, अनुयायी ग्रहन करतात. यावर्षी जपान येथील ४० उपासक दीक्षा घेणार आहेत. बुधवारी रात्री पर्यंत २० लोक नागपूरात पोहोचले असून उर्वेरीत गुरूवारी येणार आहेत. याशिवाय उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यातील हजारो अनुयानी नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. तसेच उपासक, उपासिका कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्ते रवीकीर्ती यांच्या नेतृत्वात दीक्षाघेण्यासाठी नागपूरला पोहोचत आहेत.

भदंत ससाई अनेक वर्षांपासून धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेत आहेत. भिक्खू संघाच्या सहकार्याने धम्मदीक्षेचा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. दर वर्षी हजारो लोक दीक्षा घेतात. उपासकांसाठी दीक्षाभूमी ही प्रेरणाभूमी असून येथून मिळालेली उर्जेमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे उपासक, उपासिका आणि अनुयायी मोठ्या प्रमाणावर येतात आणि धम्मदीक्षा घेतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत जि .प. तोंडली शाळेची जि. प .धानोली शाळेला व प्रयोगशाळेला भेट

Fri Oct 11 , 2024
कोदामेंढी :- शासनाच्या शिक्षण विभागाच्या नवीन जीआर नुसार आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम होत असतात. त्या अंतर्गत दिनांक 5/10/2024 शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,तोंडली शाळेच्या मुख्याध्यापिका अनुुराधा धुर्डे, सहशिक्षक निलेश जाधव व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी केंद्र शाळा धानोली येथे परिसर भेटीचे आयोजन केले. तसेच तेथील प्रयोग शाळेला भेट दिली. यावेळी केंद्रप्रमुख शिक्षक भिवगडे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com