ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे उसळला जनसागर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील शांती मार्च चे आयोजन

कामठी :- दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लाखो अनुयायी देशाच्या काण्या कोपऱ्यातून भेट देत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एक आठवडा भर अनुयायांची अलोट गर्दी असते.ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाची पूर्व तयारी करण्यात आली असून भेट देणाऱ्या भावीकाकरिता आवश्यक ती सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून व परदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागता करिता ड्रॅगन पॅलेस टेम्पल सज्ज झालेले आहे अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी पत्रकाद्वारे दिली.

9 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस ला भेट देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाची पूर्वतयारी ची आढावा बैठक घेऊन परिसराची पाहणी केली व नगर परिषद कामठी ,विद्दुत विभाग ,आरोग्य विभाग,इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरी सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसेच पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सुद्धा कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसराची पाहणी केली व कायदा व सुव्यवस्था चा आढावा घेतला.यावेळी सहपोलिस आयुक्त, पोलीस उपायुक्त ,उपविभागोय पोलीस अधिकारी,पोलिस निरीक्षक, इत्यादी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलिस बंदोबस्त ,कायदा व सुव्यवस्था ,पार्किंग व्यवस्था, ट्राफिक व्यवस्था,सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सुविधा तातडीने ऊपलब्ध करून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱया भाविकांची गैरसोय होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याचे निर्देश दिले.

68 मीटरच्या पंचशील ध्वजाने परमपूज्य डॉ बाबासाहेबांना सलामी

– 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.तदनंतर सकाळी 11 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस दादासाहेब कुंभारे परिसरात असलेले डॉ बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती शिल्पाला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करून 68 मीटरच्या पंचशील ध्वजाने सलामी देण्यात येईल.उल्लेखनीय आहे की 68 मीटर चा हा पंचशील ध्वज श्रीलंका येथून मागविण्यात आला आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराला आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आलेली आहे.परिसरात मोठ्या प्रमाणात पंचशील ध्वज लावण्यात आले ले असल्यामुळे ड्रॅगन पॅलेस परिसर हा धम्ममय झाला आहे दिनांक 10 ते 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश दिल्या जाईल अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेम्पल चे व्यवस्थापक राजेश शंभरकर यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एक पौधा एक विद्यार्थी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे

Fri Oct 11 , 2024
– लकी ड्रॉ द्वारे १० विद्यार्थ्यांची निवड   – स्पर्धेत ७ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित एक पौधा एक विद्यार्थी २०२४ स्पर्धेत चिल्ड्रेन्स अकॅडेमी इंग्लिश मिडीयम शाळेच्या १० विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले. मनपा सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. शहराच्या हरितीकरणास संजीवनी, जैवविविधतेला प्रोत्साहन मिळावे याकरीता वृक्ष लागवड व जतन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com