राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्यावतीने ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या समान व असमान निधी योजना राबविण्यात येते. राज्यात ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेसाठी ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आली आहे.

योजनेच्या नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी २५ लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य योजना राबविण्यात येते. असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. त्यात फर्निचर खरेदीसाठी ४ लाख व इमारत बांधकाम १० ते १५ लाख, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी २ लाख ५० हजार व आधुनिकीकरणासाठी विशेष अर्थसहाय्य २ लाख, महोत्सवी वर्ष जसे ५० वर्ष, ६० वर्ष, ७५ वर्ष, १०० वर्ष, १२५ वर्ष, १५० वर्ष साजरे करण्यासाठी ६ लाख २० हजार रुपये अर्थसहाय्य, इमारत विस्तार १० लाख, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी 1 लाख 50 हजार, 2 लाख 50 हजार व 3 लाख रुपये, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बालकोपरा स्थापन करण्याकरीता ६ लाख ८० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रासह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि.30 नोव्हेंबर पर्यंत पाठवावेत, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुरात जल पर्यटन महोत्सवाचे आयोजन

Fri Oct 11 , 2024
– फुटाळा तलाव येथे 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आयोजन नागपूर :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत आयोजित नागपूर जल पर्यटन महोत्सव अर्थात नागपूर अॅक्वा फेस्ट १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन फुटाळा तलाव येथे शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आणि उपमुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com