गच्चीवरून तोल जाऊन खाली पडल्याने महिलेचा मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राहुल बुद्ध विहार जवळील रहिवासी एक विवाहित महिला घरचे कपडे वाळविण्यासाठी घराच्या छतावरील गच्चीवर जाऊन कपडे वाळवून खाली उतरत असता चादर ला पाय अडकल्याने तोल जाऊन गच्चीखाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ झाल्याची घटना मागिल महिन्यात घडली असता सदर महिलेला उपचारार्थ खाजगी रुग्णालयातून नागपूर च्या मेडिकल हॉस्पिटल ला दाखल केले असता गत मध्यरात्री 2 दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतक महिलेचे नाव सिंधुताई कैलास बन्सोड वय 55 वर्षे रा राहुल बुद्ध विहार जवळ कामठी असे आहे.

पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून मृतक महिलेच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून कामठी च्या मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक महिलेच्या पाठीमागे 1 मुलगा व चार मुली असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली

Thu Oct 3 , 2024
– रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन – धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन – धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :- राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत, असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com