नागपूरच्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड – वेकोली येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

नागपूर :- केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या सिव्हिल लाईन्स स्थित सार्वजनिक उपक्रम असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड -वेकोलि द्वारे स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.

17 सप्टेंबर रोजी वेकोलीच्या मुख्यालयात 2700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी स्वच्छता शपथ घेऊन आपल्या कार्यालयामध्ये साफसफाई केली. याच अभियानाअंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ ही भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. आत्तापर्यंत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात एकूण 7800 रोपे लावण्यात आली असून त्यांचे वितरणही करण्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेचेही लक्ष्य ठेवण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत चंद्रपूर बसस्थानक, छिंदवाड्याचे छोटे महादेव, वणीचे उर्जाग्राम बाजार, बल्लारपूरचे रामपूर बसस्थानक आदी ठिकाणांची स्वच्छता वेकोलीतर्फे करण्यात आली. तीर्थक्षेत्रांची ही स्वच्छता या मोहिमेदरम्यान करण्यात आली असून याअंतर्गत सावनेरचे महात्मा गांधी खाण इको पार्क, कोराडीचे मंदिर, चंद्रपूरचे महाकाली मंदिर, उमरेडचे गजानन मंदिर, छिंदवाड्याचे हिंगलाज शक्तीपीठ मंदिर यांचा समावेश आहे

स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत 650 स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट, टी-शर्ट वाटप होणार असून आतापर्यंत 120 सेफ्टी किट, टी-शर्ट इत्यादी पुरविण्यात आले आहेत. याशिवाय विविध शाळा व संस्थांमध्ये स्वच्छते संदर्भात जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने या विषयावर निबंध, प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, चित्रकला, पोस्टर मेकिंग अशा स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्वच्छता मित्रांसाठी आतापर्यंत 9 आरोग्य शिबिरे वेकोलि द्वारे आयोजित करण्यात आली आहेत.या मोहिमेत वैकोलीने विविध प्रयत्नांतून 19 हजारापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 15781 लोकांपर्यंत पोहोचण्यात वेकोलिला यश आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमी चे विस्तारीकरण झालेच पाहिजे - राकेश धारगावे

Sat Sep 28 , 2024
नागपूर :- Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com