‘चलो’ ॲपमुळे परिवहन सेवेत सुसूत्रता

– चलो मोबिलिटीचे अरुण गिदरोनिया यांची माहिती

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये ‘चलो’ ॲपचा समावेश करण्यात आल्यामुळे प्रवाशांसाठी अनेक गोष्टी सुलभ झाल्या तसेच प्रशासनाच्या दृष्टीने नियंत्रण सहज झाले. ‘चलो’ ॲपमुळे परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आली, असे मत चलो मोबिलिटी प्रा. लि. चे सीनिअर व्हॉइस प्रेसिडेंट अरूण गिदरोनिया यांनी व्यक्त केले.

‘चलो’ ॲपच्या कार्यशैलीबाबत गिदरोनिया यांनी बुधवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ॲपबाबत सविस्तर माहिती सादर केली. याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक  गणेश राठोड, परिवहन विभागाचे अधिकारी विकास जोशी, अरुण पिंपरुडे, ‘चलो’ ॲपचे व्यवस्थापक मन यादव, सचिन गाढवे आदी उपस्थित होते.

‘चलो’ ॲपवर ‘रिअल टाईम मॉनिटरींग’ असल्यामुळे प्रवाशांना किती वेळेत बस येणार याची माहिती होतेच शिवाय बसमध्ये उपलब्ध सिटची देखील माहिती ॲपवरून होत असल्याचे अरूण गिदरोनिया यांनी सांगितले. ऑनलाईन पासेस, ऑनलाईन बस ट्रॅकिंग, ऑनलाईन बस तिकीटींग व यु.पी.आय. द्वारे तिकीट घेण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचतो. तिकिटासाठी युपीआय द्वारे पैसे देण्याची व्यवस्था असल्यामुळे सुट्या पैशांची अडचण देखील दूर झाली आहे. याशिवाय डिजिटल प्रणालीमुळे प्रशासनाच्या दृष्टीने देखील नियंत्रणामध्ये सुसूत्रता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील चार महिन्यापासून नागपूर शहरात ‘आपली बस’ सेवेमध्ये ‘चलो’ ॲपचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या चार महिन्यामध्ये नागपूर शहरातील ४० हजारावर प्रवाशांना चलो ॲप डाउनलोड केले आहे. शहरबस सेवेमध्ये ‘चलो‘ ॲपमुळे प्रवाशी संख्या वाढली व सोबतच महसूल देखील वाढल्याची माहिती श्री. अरूण गिदरोनिया यांनी सादर केली. मागील चार महिन्यात बसच्या तिकीटासाठी डिजिटल पेमेंट पद्धतीचा अवलंब देखील वाढल्याचे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अहिप की विदर्भ प्रान्त बैठक संपन्न

Thu Sep 26 , 2024
– एक करोड़ लोगोंकों भोजन कराएगा अहिप नागपुर :- अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद/राष्ट्रीय बजरंग दल एवं राष्ट्रीय महिला परिषद के संयुक्त तत्वावधान में दि. २२।०९।२०२४ रविवार को गांधीबाग के यादव समाज भवन हाल में विदर्भ प्रांत बैठक का आयोजन किया गया था। संस्थापक हिंदू हृदय सम्राट डॉक्टर प्रवीण तोगड़िया के मार्गदर्शन में मुख्य अतिथि संगठन की केंद्रीय मंत्री मा माला बेन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com