घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

कुही :-  फिर्यादी नामे- शंकर महादेव साठवने वय ५८ वर्ष रा. पाचगाव जि. नागपुर यांना माहिती मिळाली की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा पाचगाव बँकेच्या आतमधील रूमचे लॉक तुटलेल्या स्थितीत आहे. व कॅशीअर रूमचे सामान अस्तव्यस्त असुन रूम मधील लाखडी आलमारीचे दार तोडुन लोखंडी तिजोरी बाहेर काढलेली दिसली. तिजोरीची पाहनी केली असता तिजोरी व्यवस्थित दिसली. तिजोरी तुटली नाही बँकेची पाहनी केली असता कोणतीही वस्तु चोरीला गेली नाही. तसेच पोलीसांना एक संशयीत चार चाकी स्विफ्ट डिझायर वाहन क्र. एम एच ३१ सी ८९७७ ही मिळालेली असून विधीसंघर्ष बालक सुध्दा दिसुन आला. त्याला विचारपुस केली दरम्यान त्याने आपल्या साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली. आरोपी १) मुकेश २) नरेश महीलागे ४) प्रदिप उर्फे दादु सर्व रा. नागपुर यांचेविरूद्ध कलम ३३१(४), ३०५, ६२, ३(५), भा.न्या. सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोनि भानुदास पिदुरकर, सपोनि इंगोले, सफौ संजय कानडे, पोहवा दिलीप लांजेवार, पोऊं आशिश खराबे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोमवारी “एक पेड माँ के नाम” उपक्रमाची सुरुवात

Sat Sep 21 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवार २३ सप्टेंबर रोजी एयर फोर्स, सेमिनर हिल्स येथून “एक पेड माँ के नाम” उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्यासह उपायुक्त, सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहतील. केंद्र सरकारच्या स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com