कलार समाजातील ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यवतमाळ :- येथील कलार(कोसरे) समाजाची सभा सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहामध्ये झाली. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य, भाजपा ओबीसी मोर्चाचे पश्चिम विदर्भ प्रमुख राजेंद्र डांगे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा झाली. यावेळी डा.गणेश नाईक, प्रमोद मेश्राम, संतोष मानकर, कोसरे कलार समाजाचे अध्यक्ष विनायकराव कावरे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन मेश्राम, सचिव सुधाकर ऊके, जितेंद्र ऊके, कार्याध्यक्ष राजेंद्र शेंडे आदि उपस्थित होते. कलार समाजातील विविध समस्यांवर यावेळी चर्चा झाली. राजेंद्र डांगे यांचे हस्ते समाजातील ज्येष्ठ नागरिक कुंतीकुमार उके, शंकरराव सुरसाऊत, तसेच बारावीमध्ये 75 टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल श्रेयश मेश्राम याचा सत्कार करण्यात आला. महसुल विभागाचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून नरेंद्र ऊके यांना 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री संजय राठोड यांनी सम्मानित केले. याबद्दल त्यांचाही सत्कार डांगे यांनी केला. सर्वशाखीय कलार समाजाच्या प्रगतीकरीता भविष्यात करावयाच्या कार्याची माहिती राजेंद्र डांगे यांनी देवून उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. कलार समाजातर्फे यावेळी राजेंद्र डांगे यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे प्रास्तविक विनायक कावरे, संचालन नितीन मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार सचिन कावरे यांनी मानले. सभेकरीता राजेंद्र मेश्राम, नितीन ऊके, सुरेश पटले, मयुर ऊके, दिनेश सागरे आदिनीं सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करणारे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Sep 19 , 2024
– आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ठाणे :- एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करीत आहे आणि यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com