सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 48 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (28) रोजी शोध पथकाने 48 प्रकरणांची नोंद करून 31200 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु 1600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामांकरीता बंद करणेबाबत एकूण 2 प्रकरणांची नोंद करून रु 15000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 19 प्रकरणांची नोंद करून रु 3800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूर्व विदर्भ कार्यकर्ता मेळावा संपन्न

Thu Jun 29 , 2023
दिल्ली, पंजाब व गुजरात प्रमाणे महाराष्ट्रात संघटन मजबूत केल्या जाईल – गोपाल इटालिया सहप्रभारी महाराष्ट्र नागपूर :-आज नागपूर येथील पांडुरंग सभागृह येथे पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रामुख्याने महाराष्ट्राचे सह प्रभारी गोपाल इटालिया, डॉ देवेंद्र वानखडे,  जगजीत सिंघ, अंबरीश सावरकर,अशोक मिश्रा, मनोहर पवार, डॉ जाफरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com