मोहन भागवत यांच्या व्यक्तव्याचा जाहीर निषेध

– शिवरायांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून शिवजयंती उत्सव सुरु केला – किशोर कन्हेरे 

नागपूर :- रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी केले त्याचा निषेध आम्ही करीत आहोत.

१८८० साली पुण्यावरून महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर जाऊन आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली हृयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत याला कोणीही नाकारू शकत नाही.

१८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील पहिला शिवचरित्र पोवाडा लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीला सर्व प्रथम सुरुवात महात्मा फुले यांनी केली.तेव्हा पासुन देशभरात दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात येतो.हा वारसा घराघरात पोहोचवण्याचे काम मा.फुले यांनी केले . १८८० साली जोतिराव पुण्यातून आपल्या सहकार्यां सोबत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात खाली शिवरायांची समाधी जोतिरावांनी शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिले शिवजयंती साजरी करण्याचे श्रेय हे लोकमान्य टिळकांना नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांना आहे हे अभिमानाने सांगता येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. किशोर कन्हेरे (प्रवक्ता शिवसेना) चिटणीस, अ.भा.महात्मा फुले समता परिषद. श्याम चौधरी, राजेश रंगारी, विजय नाडेकर, रमेश गिरडकर, प्रभाकर आंजनकर, संतोष सिंग, पुरुषोत्तम वाडीघरे, शैलेश मानकर, रूषि कारूंडे, ईश्वर बरडे, किशोर गायधने, गजानना चकोले, देवेंद्र काटे यांनी निषेध केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात बॉक्साईट, कायनाईट-सिलीमनाईट, तांबे खनिजांचा शोध

Sat Sep 14 , 2024
– राज्य भूवैज्ञानिय कार्यक्रम मंडळाची ६०वी बैठक – गोंदिया-छत्तीसगड क्षेत्रात युरॅनियमचे पूर्वेक्षण नागपूर :- भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाद्वारे खनिज सर्वेक्षण व समन्वेषणाच्या १२ भूवैज्ञानिय योजनांमुळे नागपूर जिल्ह्यात कायनाईट-सिलीमनाईट या खनिजांचे साठे शोधण्यात आले असून नागपूर शहर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चूनखडक तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात बॉक्साइट खनिजांची विपूल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचा शोध घेण्यात आला आहे. परमाणु खनिज संचालनालयातर्फे गोंदिया व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com