भाडेकरूची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चंद्रमनी नगर येथे किशोर पौणिकर यांच्या घरी भाड्याने वास्तव्यास असलेल्या भाडेकरू इसमाने घरी कुणी नसल्याचे संधी साधुन घराच्या छताच्या लाकडी बल्लीला सुती टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री 8 वाजता घडली असून मृतकाचे नाव राजू रामचंद्र वानखेडे वय 45 वर्षे रा चंद्रमनी नगर कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

Jharkhand State Formation Day Celebrated in Maharashtra Raj Bhavan

Fri Nov 17 , 2023
– Maharashtra Governor Ramesh Bais describes Jharkhand as the finest creation of God Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais today described Jharkhand as one of the finest creations of God. Stating that Jharkhand is endowed with bountiful nature, minerals and art, the Governor said the government is giving due importance to promoting the rich arts of Jharkhand. Recalling his tenure […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com