गृहकर्ज मिळवुन देण्याच्या नावावर महिलेने केली १५ जणांची फसवणुक.

रामनगर सह गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;लाखो रुपयांचा घातला गंडा

गोंदिया –  शहरात येथील महिलांना गृह कर्ज मिळवुन देण्याच्या नावावर त्यांच्याकडुन २ लाख २७ हजार रूपये गोळा केले तसेच गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या सावराटोली येथील ईशा गौतम यांच्या कडून सुद्धा ४ लाख रुपये लोन मिळवुन देण्याच्या नावाने घेतले. तर या फसवुनक करणाऱ्या जोती गर्ग ३८ वर्ष रा. गड्डटोली गोंदिया येथे राहणाऱ्या महिलेवर रामनगर सह शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

गोंदिया शहरालगत असलेल्या कटंगीकला येथील रस्तकला धनंजय कठाने यांनी रामनगर पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या ओळखीची महिला अनिता मदारे ४५, रा. कटंगीकला, हिने जानेवारी २०१६ मध्ये ज्योती राजेश गर्ग ३८ रा. गड्डाटोली गोंदिया हिच्यासह त्यांच्या घरी आल्या. आयसीआयसीआय बँकेतुन लोन काढुन देते यांना मी ओळखते, असे सांगितले. आणि १५ मे २०१६ रोजी दुपारी १२ वाजता त्या कटंगीकला येथे रस्तकला यांच्या घरी आल्या. मी नागपुरच्या आयसीआयसीआय बँक येथुन तुम्हाला ५० टक्के सबसीडीवर लोन मिळवुन देते. एक लाख रूपये कर्ज घेण्यासाठी दिड हजार रुपये कमिशन लागेल आणि अकांउटमध्ये १० हजार रूपये डिपॉझिट ठेवावे लागतील, असे सांगितले. त्या दिड हजार रुपये घेउन गेल्या. काही दिवसांनी तुमचे लोन मंजुर झाले. तुम्हाला १० हजार रूपये द्यावे लागतील, असे म्हणाल्या. त्यांनी इकडुन-तिकडुन १० हजार जमा करून तिला दिले. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यानंतर येउन तुम्हाला ५ लाखांचे लोन मंजुर झाले. त्याचे कमिशन ४ हजार ५०० रूपये व स्टॅम्पकरिता ३ हजार असे एकूण ७ हजार ५०० रूपये द्यावे लागतील, असे म्हटले. तिला ७ हजार ५०० रूपये, कोटेशनचे एक हजार असे संपुर्ण २० हजार रूपये ज्योती गर्ग हिला दिले; परंतु तिने अद्यापही रस्तकला कठाणे यांना बँकेतुन लोन मिळवुन दिले नाही. घर तयार करण्याकरिता पैशाची गरज असल्याचे तिच्यावर विश्वास ठेवुन लोन मिळेल, या आशेने रस्तकला यांनी तिला टप्याटप्याने पैसे दिले होते. परंतु त्यांच्या खात्यात पैसे न आल्याने जोती गर्ग ला आपले पैसे परत मागितले मात्र पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने या तिची तक्रार रामनगर पोलिसात केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com