वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १२६, मोतीलाल नगर, दिघोरी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मनोज मोतीराम डोर्लोकर वय २८ वर्ष यांनी त्यांनी निसान कंपनीनी मायका कार क. एम. एन ४९ ए.ई १६:०९ किंमती १,२५,०००/- रू. नी नग समोर पार्क करून लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे अनोळखी आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात हुडकेश्वर पोलीसांनी सि.सी.टी.व्ही फुटेजचे आधारे तांत्रीक तपास करून आरोपी नामे निलेश किशोराव खंगार वय ३९ वर्ग रा. प्लॉट नं. ८०, रमनामारोती, नंदनवन, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली आसता, त्याने वर नमुद कार चोरी केल्याचे कबुल केले. आरोपीचे ताब्यातुन कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीस गुन्हयात अटक केली आहे. तसेच पोलीस ठाणे हद्दीतुन दिनांक ०५,०९,२०२४ रोजी जुना सुभेदार ले-आउट, येथुन अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ३१ डि.डी २८४३ किंमती १०,०००/- रू. ची व दिनांक १८.०७. २०२४ रोजी म्हाळगी नगर चौकातुन फिर्यादी यांची सिल्व्हर रंगाची मॅस्ट्रो गाडी क. एम. एच ४९ वाय ३९३७ किंमती ३५,०००/- रू. नी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. दोन्ही गुन्हयाचे तपासात हुडकेश्वर पोलीसांनी सि.सी.टी.व्ही फुटेजचे आधारे तांत्रीक तपास करून व मिळालेल्या माहितीच्या आधारे एका विधीसंघर्षग्रस्त बालकास त्याचे पालका समक्ष ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने वरील दोन्ही वाहने चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन दोन्ही वाहने जप्त करण्यात आलेले आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी अर्थित चांडक, पोलीस उप आयुक्त (परि. क. ४) विनायक कोते, सहा. पोलीस आयुक्त (अजनी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, ज्ञानेश्वर भेदोडकर, पोनि. नागेशकुमार चातरकर (गुन्हे), सपोनि. ओमप्रकाश भलावी, पोहवा. गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, दिनेश गाडेकर, चेतन वैद्य, ताराचंद अंबाडरे, नापोअं. विजय सिन्हा, पोअं. मंगेश मडावी, हिमांशु पाटील व कुणाल उके यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाच महिन्यात दोन हजारावर वीजचो-या उघडकीस

Wed Sep 11 , 2024
– नागपूर जिल्ह्यातील 1 हजार 695 तर वर्धा जिल्ह्यातील 436 चो-यांचा समावेश नागपूर :- वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाने आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल 2 हजार 131 वीजचो-या उघडकीस आणल्या. यात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 160, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 907 तर वीज मीटर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com