इस्राईलमध्ये एक लाख उमेद‌वारांना रोजगाराची संधी

यवतमाळ :- राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या सौजन्याने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कौशल्यप्राप्त एक लाख युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रथम टप्प्यात 10 हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बांधकाम क्षेत्रातील फ्रेमवर्क, शटरींग, कारपेंटीग, लोखंड वाकवणे, बार बेन्डींग, पॉलिश फरशी काम (सिरेमिक टाइल्स), गिलावा काम (प्लास्टरिंग काम), नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात वृध्द, आजारी व्यक्तींची काळजी व देखभाल घेणे, इंजक्शन, ड्रेसिंग इत्यादी वैद्यकीय कामाचे कौशल्य, तत्काळ उपचार करण्याबाबतची माहिती ही कौशल्य असलेल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

इस्राईल मध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारास जुजबी इंग्रजी विषयाचे ज्ञान, क्षेत्रासंबंधी प्राथमिक कौशल्य व प्रमाणपत्र, किमान सहा महिने वैध असणारा पासपोर्ट, किमान शिक्षण अट नाही, वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे तसेच कोणताही प्रदीर्घ आजार नसावा.

इस्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, आरोग्य विषयक तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास अंदाजित एक लाख 37 हजारापर्यंत मासिक वेतन व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

नोकरीचा कॉन्ट्रॅक्ट कालावधी किमान ३ वर्ष असेल. पुढील टप्प्यात यासह इतर क्षेत्रातील एक लाख कौशल्यधारक व युवतींना केअरगिविंग, नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी १८००१२०८०४० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. बांधकाम क्षेत्रातील इच्छूकांनी https://t.ly/FMYyR या लिंकवर नोंदणी करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रोत्साहन लाभासाठी मयत शेतकऱ्यांचे कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

Tue Sep 10 , 2024
यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र परंतू आधार प्रमाणिकरणापूर्वीच निधन झालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ अदा करता आला नाही. अशा शेतकऱ्यांच्या वारसांनी संबंधित बँकेत कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाभासाठी पात्र असलेल्या मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत महाआयटीकडून आदर्श कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढून टाकण्याची सुविधा दि.९ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com