सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 104 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. सोमवारी (ता. 27) रोजी उपद्रव शोध पथकाने 104 प्रकरणांची नोंद करून 60 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करुन 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 9 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करुन 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन 2 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 40 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 16 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवारी (ता. 27) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत रुपेश स्वीट्स नंदगिरी रोड ठक्करग्राम यांच्याकडुन 5 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत बांधकामा कार्यदरम्यान घेतलेल्या सुरक्षाचे अवज्ञा करणे या अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लंबोधर अपार्टमेंट दुपारे लेआऊट रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचराच्या अवज्ञा करणे या अंतर्गत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत ताज क्लेनिक नाल साहाब चौक हंसापुरी बॉयो मेड कचरा रस्त्यालगत कचरा टाकलेबाबत यांच्याकडुन 5 हजारांचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत अन्नपुर्णा फुड सर्विस अमरावती रोड अनधिकृत ठिकाणी हॉटेलचा कचरा टाकल्याबाबत यांच्याकडुन 5 हजारांचा दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत सार्थ इंफ्रास्ट्रचर नरेंद्र नगर, साई छाया रेसिडेन्सी नवीन मनीष नगर आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत हिंगनेकर बिल्डर्स बिनकर कॉलोनी तांडापेठ या तीन प्रतिष्ठानांकडुन बांधकामाचा कचरा रस्त्यालगत पसरविलेल्याबाबात एकुण 30 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. आशी नगर झोन अंतर्गत स्मार्ट लॅर्निग क्लासेस राजगृह नगर यांच्याकडुन परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 9 प्रकरणाची नोंद करून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी यंत्रणा सज्ज ठेवा’ - - अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी घेतली बैठक

Tue May 28 , 2024
नागपूर :- पावसाळ्यात उद्भवणा-या डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले. मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी(ता.२८) ‘राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम 2024’ अंतर्गत ‘किटकजन्य आजार व डेंग्यू’ संदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीत उपायुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com