कंत्राटी शिक्षक भरतीकरीता मुळ दस्ताऐवज पडताळणी ४ व ५ सप्टेंबरला

– उमेदवारांनी नियोजित तारखेला उपस्थित राहावे – मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

– शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या अपात्र यादीतील उमेदवारांनाही मिळणार संधी

गडचिरोली :- पेसा क्षेत्राकरिता कंत्राटी शिक्षक भरतीसाठी १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीनुसार पात्र उमेदवारांचे मूळ दस्तावेजांची पडताळणी ४ व ५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे तसेच शैक्षणिक अहर्ता धारण केली असतानाही ज्यांचे नाव अपात्र यादीत आले आहे त्या उमेदवारांनीदेखील ४ सप्टेंबर रोजी दस्तावेज पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. शासनाचे निर्देशानुसार जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत पेसा क्षेत्रातील दोन टप्प्यातील कंत्राटी शिक्षक भरती पुर्ण झाल्यानंतर उर्वरीत रिक्त पदावर अनुसुचित जमातीचे व इतर प्रवर्गाचे इयत्ता 1 ते 5 व इयत्ता 6 ते 8 वी करीता अध्यापन करण्यास प्राथमिक शिक्षक पदाकरीता विहीत शैक्षणीक व व्यावसायिक अर्हता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सदर जाहिरातीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करुन जाहिरातीत नमुद बाबीनुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद गडचिरोलीचे संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषदेच्या सुचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदे विचारात घेता तातडीने कंत्राटी शिक्षक नियुक्ती करणे अनिवार्य असल्याची बाब विचारात घेता सदर पात्र यादीनुसार मुळ दस्ताऐवजांचे तपासणीकरीता जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली चे सभागृह, चामोर्शी रोड, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी पात्र यादीतील अनुक्रमांक 01 ते 400 व दिनांक 05 सप्टेंबर 2024 रोजी अनुक्रमांक 401 ते यादीतील अंतिम क्रमांकावरील उमेदवारापर्यंत उपस्थित राहण्यास दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजीचे परिपत्रकान्वये सुचित करण्यात आलेले आहे. विहीत अर्हता धारण केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक अनुसुचित जमातीचे उमेदवारांना नियुक्तीमध्ये प्राधान्य देण्यात येणारसल्याने त्यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र, स्थानिक अनुसुचित जमातीचे उमेदवार असल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील. सर्व उमेदवारांनी स्वसाक्षांकीत स्वयंघोषणापत्र तपासणीकरीता येतांना सोबत आणावे. जाहिरातीत नमुद विहीत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या मागासवर्गीय व दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास कमाल वय 45 वर्षे असल्यास अशा उमेदवारांनी मुळ दस्ताऐवज तपासणीकरीता उपस्थित राहावे. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चांदा क्लब येथे होणाऱ्या प्रदर्शनीस मोठा प्रतिसाद

Tue Sep 3 , 2024
– १४७ मूर्तिविक्रेत्यांनी केली नोंदणी – लकी ड्रॉ द्वारे स्टॉल वाटप   चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीस मोठा प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १४७ मूर्तिविक्रेत्यांनी येथे विक्रीसाठी स्टॉल्स बुक केले असुन या सर्व विक्रेत्यांना लकी ड्रॉ द्वारे स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे. येत्या ७ सप्टेंबर पासुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!