उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी व वाडी स्वच्छता निरीक्षकांचा सत्कार!

– पोलीस अधिकारी राजू पैडलवार, गजानन तांदुळकर, धनंजय गोतमारे यांचा सन्मान

– घरचा मान अतुलनीय,आम्हांस मिळेल प्रेरणा,! – स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे 

वाडी :- मूळचे वाडी-डिफेन्स शी संबंधित असलेले आणि सध्या नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राजू पैडलवार, गजानन तांदुळकर या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा व वाडी नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे यांच्या बदली निमित्त रविवारी सत्कार व भावपूर्ण निरोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वाडी क्रिकेट असोसिएशनने वाडी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या सत्कारमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, रॉकेप्ट कॅफेचे संचालक चंदन राठोड, अलिबागचे सामाजिक कार्यकर्ते दयाराम जांभूळकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तलमले,क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख नेमचंद राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. सुभाष खाकसे यांनी सांगितले की, राजू पैडलवार हे नागपूर शहर पोलीस एएसआय विभागात कार्यरत असून ते वाडी येथील रहिवासी असून त्यांच्या उत्कृष्ट सेवेच्या कालावधीत आतापर्यंत शेकडो गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले.दुसरे सत्कामूर्ती पीएसआय या पदावर कार्यरत असलेले गजानन तांदुळकर यांनीही दोन वर्षे वाडी पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे. सध्या ते नागपूर गुन्हे शाखेत कार्यरत असून 35 वर्षांच्या सेवेतील उत्कृष्ट तपास आणि कार्य लक्षात घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पुरस्कारानेही गौरविण्यात आले.वाडी न.प.चे स्वच्छता निरीक्षक कोरोना योद्धा धनंजय गोतमारे यांच्या बदलीबाबत कार्यक्रमाचे आयोजक नरेशकुमार चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करतांना नगर परिषदेतील आरोग्य विभागासह इतर विभागांमध्ये केलेल्या सक्रीय व अविरत कामाच्या उत्कृष्ट शैलीमुळे वाडीतील जनतेला कोरोना काळात मोठा दिलासा मिळाला होता, गेल्या 10 वर्षातील त्यांचा जनसंपर्क,पाणीटंचाई आणि कोरोनाच्या भीषण संकटात केलेले कार्य वाडी वासीयांच्या सदैव स्मरणात राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, दयाराम जांभुळकर, गजानन तलमले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी दिलीप तारळकर,प्रवीण सिंग,क्रिकेट असोसिएशनचे मनोज चोपडे, गजानन घोडे, प्रभाकर लाडेकर, रणजित ठाकूर, दीक्षित रहांगडाले, अमोल माहुरे, राजेंद्र भोसले, दुग्धनाथ शेंडे, डॉ ताजणेकर, सूरज गायकवाड, मंगेश मश्राम, प्रकाश रहांगडाले, रितेश बारस्कर, पप्पू पटले, अन्वर खान उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना तिन्ही सत्कर्ममूर्तींनी त्यांचे कार्य ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगून त्यांच्या कार्याबद्दल प्रशासनाने दाखवलेला आदर कौतुकास्पद आहे.आणि आता त्यांच्या रहिवासी परिसरात त्यांना मिळालेला हा सन्मान अनमोल आणि अविस्मरणीय असल्याचे सांगून या सामाजिक सन्मानातून त्यांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.सुभाष खाकसे यांनी केले तर आभार वाडी क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी हर्ष कापसे यांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशाने जिल्ह्यात ५५ पाणंद रस्त्यांना मंजुरी

Mon Sep 2 , 2024
– शेतकऱ्यांची अडचण सोडविण्यास दिले प्राधान्य यवतमाळ :- शेती विकासात सर्वात महत्वाचे योगदान असलेल्या पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेवून पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ५५ पाणंद रत्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पावसाळ्यात शेतात जाण्यायोग्य रस्ते नसल्याने ठिकठिकाणचे शेतकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com