नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :-दिनांक २९.०८.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये २४ केसेसे मध्ये एकुण ०४ ईसमांवर कारवाई करून २,५२०/-रू, चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०७ केसमध्ये २६ ईसमावर कारवाई करून रू. २,४५,७७०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २,८७७ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,३५,८००/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित्त असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

Fri Aug 30 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत ऊंटखाना, कब्रस्तानचे गेट जवळील, भिंती लगत, फिर्यादी राजेश लक्ष्मणराव खापेकर, वय ३२ वर्षे, रा. प्लॉट नं. १५६, सप्तगिरी ले-आउट, भिलगाव, यशोधरानगर, नागपूर यांनी त्यांची स्लेंडर मोटरसायकल क. एम. एच. ४९ एच ०४५१ लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे ईमामवाडा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com