दुध भेसळ नियंत्रण समितीची वात्सल्य डेअरीला अचानक भेट

Ø दुध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेतले

Ø भेसळ थांबविण्यासाठी अचनाक भेटीस सुरुवात

Ø सण उत्सवाच्या अनुषंगाने कार्यवाही

यवतमाळ :- सण उत्सवांच्या दिवसांमध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अशी भेसळ थांबविण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्यावतीने ठिकठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे. त्यास आज सुरुवात झाली असून लोहारा एमआयडीसी येथील वात्सल्य डेअरीला अचानक भेट देण्यात आली. या भेटीत नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ होत असल्यामुळे एकुण दुध उत्पादन व मागणी यामध्ये तफावत निर्माण होऊन राज्यात दुधात कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. त्याची परिणीती दुध उत्पादन शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. याशिवाय दूध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरावर दुध भेसळ नियंत्रण समितीचे गठन करण्यात आले आहे.

या समितीच्यावतीने दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, विक्रेते यांच्याकडे अचानक भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे. सद्या सण उत्सवाच्या दिवसांना सुरुवात होत आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय समितीने अचानक भेटीस सुरुवात केली आहे. आज जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समिती‌द्वारे लोहारा एमआयडीसी येथील वात्सल्य डेयरीला सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली. समितीच्यावतीने वेगवेगळे उत्पादक, विक्रेत्यांना नियमित अचानक भेटी देण्यात येणार आहे.

भेटीप्रसंगी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.विजय राहाटे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गोपाल माहुरे तसेच जी.पी. दंदे, अ.अ उपलप, वैद्यमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक ए.एम.खरात तसेच आर. आर. गवई, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ.जया राऊत उपस्थित होते.

यावेळी डेयरीमध्ये दुध उत्पादकांकडून घेण्यात आलेल्या गाईच्या दुधाचे 10 नमुने घेण्यात आले. भेसळकरीता वापरण्यात येणारे साखर, स्टार्च, युरिया आदींचा वापर करण्यात आला का, त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती दुधात भेसळ आढळून आली नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे पनीर, कुंदा, पाश्चराईज गाय दुध, पाश्चराईज स्टॅंडर्ड दुध असे एकूण 4 नमुने तपासणी करिता प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. वैद्यमापन शास्त्र विभागा‌द्वारे सर्व मापन तपासणी करण्यात आली.

दुग्धजन्य पदार्थांचे निर्माते, विक्रेते यांनी दुध किंवा दुग्ध पदार्थांमध्ये कुठल्याही पद्धतीने भेसळ न करता नागरिकांना उत्तम दर्जाचे पदार्थच विकावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही भेसळ दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास दुग्ध व्यवसाय विकास विभागास तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

Thu Aug 8 , 2024
▪️12 व 13 ऑगस्ट रोजी दिवसभर आयोजन ▪️कुंजरु, पाथरी, करटोली, कुरडु राजभाज्यांसह मिळणार हंगामी फळे नागपूर :- जिल्ह्यातील जैवविविधता व राजभाज्या याचे आकर्षण निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. रानभाज्या या केवळ आहार आणि चवीशीच निगडीत नसून अनेक औषधी गुणतत्वे राजभाज्यांमध्ये दडलेली असून पिढ्यांपिढया पासून याच्या सेवनाला आपण अधिक महत्व देतो. प्रत्येकापर्यंत हा रानमेवा उपलब्ध व्हावा व शेतकरी गटांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com