गॅस कटरने एटीएम कापून पैशाची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, एकूण २७,३०,०००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

नागपूर :- दिनांक २३/०९/२०२३ रोजी रात्री ०२.३० वा. ते ०२.४५ वा. दरम्यान बुट्टीबोरी परीसरातील ICIC बँकेचे ATM मशीन मध्ये काही अनोळखी इसमांनी संगनमत करून प्रवेश करून गॅस कटरचा वापर करून ATM मशीनचे समोरील डिस्पेन्सर डोअर व वॉल्ट कापून ATM मशीन मधून एकुण १४,९५,२००/-रू चोरून नेल्याच्या फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे बोरी येथे अप क्र. ७७७/२३ कलम ४५७, ३८०, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात नमुद गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाच्या सुचना दिल्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना तांत्रिक पद्धतीच्या आधारे नमुद गुन्हयातील संशयित आरोपी हे एका पांढऱ्या रंगाच्या सुझुकी स्विफ्ट या चारचाकी वाहनाने येवून सदर घटना करून बोरखेडी टोल प्लाझा येथून ISO1EM 1515 या क्रमांकाने टोल पास केल्याचे दिसुन आले. सदर वाहन क्रमांकाचे वाहन पोर्टलवरून डिटेल काढले असता त्यांनी वापरलेला नंबर चुकीचा असल्याचे दिसुन आले. सदर पथकने महाराष्ट्रातील तेलंगाना येथील टोल प्लाझा चेक करून सदर वाहन आंध्रप्रदेशकडे गेल्याची तांत्रिकरीत्या निष्पन्न करून त्या आधारे नमुद्र वाहनाचा सतत ८०० किमी पाठलाग करीत पोलीस स्टेशन ढोग जि. नंदीयाल रा. आंध्रप्रदेश परीसरात सापळा रचुन नमुद वाहन थांबविले असता त्यामागे एक कंटेनर संशयितरीत्या थांबुन चारचाकी वाहनातील इसमांना ताब्यात घेत असता कंटेनरमधील ०५ इसमापैकी ०४ इसम पळून गेले. पळून गेलेले ०४ इसमांनी चोरी केलेली रक्कम सोबत घेवून पळून गेले. पळून गेलेल्या चारही इसमांचा शोध स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत आहे. घटनास्थळावर संशयित सुझुकी स्विफ्ट कार मधील ०२ इसम १) हरेत सिंग रामहंस सिंग वय ३२ वर्ष, रा. खुश पोस्ट जटवारी, ता. छाता जि. मथुरा (उत्तरप्रदेश) २) वसीम अकरम मोहम्मद आझाद, वय २४ वर्ष, रा. चिमरी जि. भरतपूर (राजस्थान) तसेच तसेच कंटेनरच्या चालकाने त्याचे नाव मोहम्मद मुस्तकीन आस मोहम्मद, वय २९ वर्ष रा. घसेडा ता. नुहु, जि. मेवात (हरीयाणा) यांना ताब्यात घेतले असता त्यांना पोलीस स्टेशन बुट्टीबोरी अप क्र. १७७७/२३ कलम ४५७, ३८०, ३४ भादवि गुन्हयाचे घटनेसंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी पळुन गेलेले ०४ इसमसह नमुद गुन्हा केल्याचे सांगितले. पुढे त्यांचे ताब्यातून सदर गुन्हा करतेवेळी वापरलेले पांढऱ्या रंगाच्या सुझुकी स्विफ्ट कार HR-98 / L4506 तसेच कंटेनर क्र. RJ-14 / GN – 4874 व त्यामधून एमटीम कापणेकरीता लागणारे ऑक्सीजन सिलेंडर, एल.पी.जी. सिलेंडर व इतर साहीत्य जप्त करून एकुण २७,३०,००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पळुन गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असुन सदरचा एटीएम गैस कटरने कापून पैसे चोरी करण्याचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भा.पो.से.), अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण  डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बटुलाल पांडे, सहायक फौजदार महेश जाधव, नाना राऊत, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, राजेंद्र चौधरी, राजेंद्र स्वतकर, आशिष भुरे, इक्बाल शेख, मयुर टेकले, अरविंद भगत, विनोद काळे, पोलीस नायक रोहन डाखोरे, अमृत किनगे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल, नितेश पिपरोदे, विपीन गायधने, पोलीस अंमलदार राकेश तालेवार, चालक आशुतोष लांजेवार, सुमित वांगडे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गिट्टीचुरीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद, वाहनासह एकूण १०,४०,८००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Tue Sep 26 , 2023
– पोलीस स्टेशन सावनेर ची कारवाई सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पाटणसावंगी शिवार पाटणसावंगी टोल नाकावरून गिट्टीचुरीची चोरटी वाहतुक ट्रकने होत आहे, अशा माहितीवरून पाटणसावंगी शिवार पांटगसावंगी टोल नाकावर दहा चक्का पिवळया रंगाचा ट्रक क्र. एम.एच.-४० / बीजी- ७५७४ येताना दिसला. त्यांना थांबवुन विचारपुस केली असता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com