कुख्यात गुंड स्थानबध्द

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०९.०७.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे कळमना, नंदनवन, कपौलनगर व पारडी नागपूर चे ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे प्रताप उर्फ चंचल वल्द लिलाधर नरवरे उर्फ ठाकुर, वय १९ वर्षे, रा. प्लॉट नं. १७, एकता नगर, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम सन् १९८१ अंतर्गत दिनांक ०९.०७.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दिनांक ११.०७.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

प्रताप उर्फ चंचल वल्द लिलाधर नरवरे उर्फ ठाकुर याचे विरूध्द पो. ठाणे कळमना, नंदनवन, कपीलनगर व पारडी नागपूर शहर येथे फौजदारपात्र कट रचुन बेकायदेशिर जमाव तयार करून खुन करणे, मृत्युच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण करणे, आपखुशीने प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, जबरीचोरी करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत पडवून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरीचोरी किंवा दरोडा घालणे, जबरीचोरी करतांना आपखुशीने दुखापत करणे, बेकायदेशीर जमावाचा घटक असणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे, दंगा करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे, समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाब‌द्दल वेकायदेशीर जमावाचा प्रत्येक घटक दोशी असणे, शांतता भंग करण्याचे उ‌द्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, अश्लिल भागेमध्ये शिवीगाळ करणे, अपराधीक जीवे ठार मारण्याची धमकी देणे, स्वीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर बळजबरी करणे, छुपा पाठलाग करणे, बालकांचा लैगींक छळ करणे, घातक शस्त्रे जवळ घेऊन फिरणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, ईत्यादी, मालमत्ता आणि शरीराविरूध्दने गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०२१ मध्ये कलम ११० (ई), (ग) सी.आर.पी.सी. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरीसुध्दा त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवल्याने सन २०२२ मध्ये एमपीडीए कायदयान्वये अन्वये ०१ वर्षाकरिता स्थानबध्द करण्यात आले होते. त्यानंतर सन २०२४ कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. सदर स्वानवध्द इसमाकडुन २२ वर्षांकरिता अंतिम बंधपत्र घेण्यात आले, परंतु सदरहु प्र. स्था. इसमाने सदर बंधपत्राचे उल्लंघन केलेले आहे. अलीकडील काळात प्र. स्था. इसमाने पो. ठाणे पारडी, नागपूर शहर हद्यीत स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उदद्देशाने तिच्यावर बळजबरी करणे, छुपा पाठलाग करणे, अश्लिल भाषेत शिवीगाळी करणे, आपराधीक जीवे मारण्याची धमकी देणे, बालकांचा लैंगीक छळ करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लघंन करणे इत्यादी स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे प्रताप उर्फ चंचल वल्द लिलाधर नरवरे उर्फ ठाकुर याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानचच्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला, त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता, त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास मध्यवर्ती कारागृह, हसुल, छत्रपती संभाजीनगर येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमूद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Fri Jul 12 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीतुन तकीयावाले बाबा दर्गाह समोर, नागपूर ते हिंगणा कडे जाणारे रोडवरून राजु तुळसीराम वाघमारे वय ४० वर्ष रा. पंचशील नगर, नागपुर हे रस्त्याने पायदळ जात असतांना, त्यांना एक क. एम.एच ४० डी.एल ७७४९ चे चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन, रोडने पायदळ जाणारे राजु वाघमारे यांना धडक देवुन गंभीर जखमी केले. जखमी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!