नागपुर :-दिनांक ०८/०७/२०२४ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय काटोल विभाग काटोल येथील स्टाफ पोस्टे काटोल हद्दीत पेट्रोलींग करीत असता मुखविरद्वारे माहिती मिळाली की, नगर परीषद काटोल समोर पिकअप गाडयांच्या मागे काही जुगारी इसम ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळ खेळत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून सदर स्टाफ यांनी नगर परीषद काटोल जवळ जावून सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे- १) राहुल भारतसिंग बावरी, वय १९ वर्ष, रा. शिख मोहल्ला काटोल २) संतोष महादेवराव बागवान, वय ३३ वर्ष, रा. सुसुद्री ता. कारंजा. जि. वर्षा ३) रघु दिंगाबर कोकाटे, वय २१ वर्ष, रा. पेठबुधवार काटोल, ४) शाहरूख निसार शेख, वय ३१ वर्ष, रा. गॅस गोडावुन जवळ सावरगांव रोड काटोल ५) धिरज संजय लोखंडे, वय २५ वर्ष, रा. अण्णाभाऊ साठेनगर काटोल ६) फरार आरोपी नामे बादल वासुदेव ताकतोडे रा. काटोल ७) फरार आरोपी प्रशांत लांडगे रा. काटोल हे जुगार खेळतांनी मिळुन आले. एकुण १) ते ५) जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) ३ मोवाईल फोन व तास पत्ते एकुण किंमती १९,००० रूपये २) नगदी १६०० रूपये एकुण किंमती २०६००/-रू. रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे काटोल कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल बापू रोहोम यांचे मार्गदर्शनात सपोनि शिवाजी नागवे, पोना जित रोकडे, नितीन लवटावार, पोशि गौरव वखाल, धुलसिंग आडे, परसराम केवटे यांनी पार पाडली.