नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

– शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा

नागपूर :- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान पदाखाली दि. 12 व 13 जुलै 2024 रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत महावितरणच्या पुणे, छत्रपती संभाजी नगर, कोकण आणि नागपूर येथील प्रादेशिक विभागाचे नाट्यसंघ सहभागी होणार आहेत.

जनसामान्यांचे आयुष्य प्रकाशमान ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी महावितरणतर्फ़े दरवर्षी नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या नाट्यस्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (भाप्रसे) यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. 12 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता तर बक्षिस वितरण शनिवार दि. 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (भाप्रसे) यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. या दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देखील लोकेश चंद्र (भा प्र से) हे भुषवतिल. या दोन्ही कार्यक्रमाला महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी आणि संचालक (वित्त)  अनुदिप दिघे प्रमुख पाहुणे म्हणून तर छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता (भाप्रसे), कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक रिचर्ड यांथन (भाप्रसे), आणि पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे प्रामुख्याने उपस्थित राहतील

जनसामान्यांचे आयुष्य प्रकाशमान ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी महावितरणतर्फ़े दरवर्षी नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. दोन दिवस चालणा-या या नाट्य स्पर्धेत दि. 12 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता पुणे प्रादेशिक संघातर्फे श्री पु. ल. देशपांडे लिखित ‘ती फ़ुलराणी’, तर दुपारी 2.30 वाजता छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक संघातर्फ़े डॉ. गणेश शिंदे लिखित ‘उत्तरदायित्व’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता कोकण प्रादेशिक संघातर्फ़े श्री सुरेश जयराम लिखित ‘डबल गेम”’ तर नाहपूर प्रादेशिक संघातर्फ़े दुपारी 2.30 वाजता प्रकाश दाणी लिखित ‘नथिंग टु से’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल.

प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेतील या विजेत्या नाट्य संघामधील ही राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा अभिनय, संवाद, संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य आणि दिग्दर्शनासाठी अत्यंत चुरशीची ठरणार असून नागपूरकर रसिकांसाठी असलेली ही स्पर्धा नाट्य मेजवानी ठरणार असल्याने रसिक प्रेक्षकांनी या नि:शुल्क दर्जेदार नाट्यकृतींचा भरपूर आस्वाद घ्यावा असे नाट्यस्पर्धा आयोजन समितीचे मुख्य समन्व्यक आणि महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आणि आयोजन समितीचे निमंत्रक अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, गोंदीया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिष गजबे आणि नाट्यस्पर्धा आयोजन समितीतर्फ़े करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Mon Jul 8 , 2024
– वेदिक – महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन नागपूर :- आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणते तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केले. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्‍तपणे स्‍थापन केलेल्या वेदिक-मह‍िंद्रा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!