संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सात जन्मी हाच पती मिळो, या मनोकामना सह महिलांनी वडवृक्षाची केली पुजा अर्चना.
कन्हान :- “सात जन्मी हाच पती मिळो”, या मनोका मना पुर्ती करिता कन्हान-कांद्री परिसरात महिलांनी वडवृक्षाची मनोभावे पुजा अर्चना करित वटवृक्षाला सात फेरे मारून, धागे गूंडाळुन विधिवत पूजा अर्चना करुन वटपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
कन्हान शहरातील बीकेसीपी शाळेच्या पटागंणा त आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथील वट वृक्षाचा झाडाजवळ सकाळ पासुन महिलांनी पुजे साठी गर्दी केली होती. मौल्यवान अलंकार परिधान करत मराठमोळ्या वेशभुषेत मनोभावे पूजा अर्चना करित सात फेरे घालुन अखंड सौभाग्यासाठी महिलां नी साकडे घातले. सुताचा धागा बांधुन महिलांनी वट पौर्णिमा उत्साहाने साजरी केली.
जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री कन्हान येथे वटपोर्णिमा निमित्त वडवृक्षाची महिलांनी मनोभावे विधिवत पुजा अर्चना केली. त्यानंतर विविध मंदिरांत जाऊन एकमेकींना हळदी-कुंकू देत ओटी भरली. दिवसभर मंदिरामध्ये आणि वडाच्या झाडा जवळ महिलांनी गर्दी केली होती. कन्हान-कांद्री परिसरात महिलांनी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली.