यवतमाळ :- केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतर्गंत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील सवलतीस पात्र व नव उद्योजक तरुणांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनस्तरावरुन निश्चित करण्यात आलेल्या आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउदयोजकांना प्रकल्प मुल्यांच्या 15 टक्के हिस्सा अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येतो.
जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवउदयोजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पळसवाडी कॅम्प दारव्हा रो,ड यवतमाळ येथे कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.