यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने दि.12 जून रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्याकरीता एनआरबी बीअरींग, छत्रपती संभाजीनगर या आस्थापनेमार्फत एकुण 116 रिक्तपदांकरीता मुलाखती घेण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये आयटीआय फिटर, टर्नर, ईलेक्ट्रिशिएन, मशिनिस्ट, वेल्डर, मेकॅनिक मशिन टुल मेंटेनन्स, टुल ॲन्ड डाय मेकर, मशिनिस्ट ग्रँडर, या आयटीआय ट्रेडच्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील उपरोक्त आयटीआय ट्रेडधारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी व आपला रोजगार निश्चित करावा. येतांना मुळ कागदपत्र सोबत आणावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा. शितोळे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी केले आहे.