नागपूर :-पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत नाईक रोड, गजानन मंदीर जवळ, महाल, नागपुर, येथे राहणारे फिर्यादी आशिष अनंतराव रणदिवे वय ४१ वर्ष यांनी त्यांची पेंशन प्लस गाडी क. एम.एच ३१ सि.ई २०५० लाल काळया रंगाची किंमती १०,०००/- रू ची घरासमोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीची गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कोतवाली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा, युनिट क. ०३ येथील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून, सि.सी.टी.व्ही. फुटेज वरून आरोपी सुनिल सेवकराम राहंगडाले वय ४३ वर्ष रा. हिरापूर, गोरेगाव, जि. गोंदीया, यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपीने वर नमुद वाहन चोरी केल्याचे कबुली दिली. आरोपीची अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत पुन्हा एक हिरो होन्डा पेंशन प्लस गाडी क्र. एम.एच ३१ सि.ब्रेड ०८१४ किमती १०,०००/- रू ची प्रितम हॉटेल मागे साईं मंदीर जवळुन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीने पोलीस ठाणे लकडगंज हद्दीतून हिरो कंपनीची पेंशन प्रो गाडी क. एम.एच ४९ ए.एम ५४०८ किंमती ४०,०००/- रू ची, तसेच आरोपीने पोलीस ठाणे कळमणा हद्दीतुन हिरो कंपीनीची पेंशन प्रो गाडी क. एम. एच ४९ ए.जी ०५५२ किंमती ३०,०००/- रु ची असे एकुण चार वाहन बोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन वरील चार वाहने किंमती ९०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी कोतवाली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील गुन्हा उघकीस आणण्याची कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, मुकुंद ठाकरे, पोउपनि, देवकाते, सफी. ईश्वर खोरडे, मिलींद चौधरी,पोहवा, मुकेश राऊत, प्रविण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जासुद, विनोद गायकवाड, नापोअं. सतोष चौधरी, पोअं. मनिष रामटेके व अनिल बोटरे यांनी केली,