दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास, नमो दिव्यांग अभियान चे भाजपा व घटकपक्षांना समर्थन

– नमो दिव्यांग अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक विकास शर्मा यांचे प्रतिपादन

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी मोठी मदत झाली आहे. दिव्यांगांसाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नमो दिव्यांग अभियान भारतने या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुती उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती नमो दिव्यांग अभियान भारत चे राष्ट्रीय समन्वयक विकास शर्मा यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, निरंजन जाधव उपस्थित होते. या अभियानाचे सदस्य असलेले सर्व श्रेणीतील दिव्यांग बंधूभगिनी या निवडणुकीत भाजपा-एनडीए, महायुतीच्या उमेदवारांना समर्थन देतील अशी ग्वाहीही शर्मा यांनी दिली. 

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी संबंधित कायद्यामध्ये संशोधन करून त्यात बदल करण्याची मागणी अनेकदा करूनही त्याकडे आधीच्या सरकारांनी दुर्लक्ष केले. मात्र दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेत भाजपा-एनडीए सरकारने दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी अनेक पावले उचलली. 2016 साली दिव्यांगजन अधिकार अधिनियम पारित करून मोदी सरकारने अनेक वर्षांपासूनची दिव्यांगवर्गाची मागणी पूर्ण केली. अपंग, विकलांग या नकारात्मक संबोधनाऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक शब्दाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्गाला सन्मान दिला. हीन, दीन, दया या श्रेणीतून या वर्गाला बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले असे शर्मा म्हणाले. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात दिव्यांगांना स्थानच नसे. मात्र भाजपाच्या 2014, 2019 आणि 2024 च्या जाहीरनाम्यांमध्ये दिव्यांगांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी अनेक आश्वासने दिली. या आश्वासनांची गेल्या 10 वर्षांत पूर्तताही केली. या निवडणुकीसाठीच्या संकल्पपात्रात भारतीय जनता पार्टीने दिव्यांगांना आवश्यक तांत्रिक उपकरणांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे, याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान दिव्यांग आवास योजना 2024 द्वारे दिव्यांगांच्या विशिष्ट गरजांनुसार परवडणारी आणि सुगम्य घरे बांधली जाणार आहेत. या निवडणुकीत राजस्थानमधील चुरू लोकसभा मतदारसंघातून दिव्यांग असलेल्या देवेंद्र झांझरीया यांना उमेदवारी देऊन पंतप्रधान मोदी यांनी राजकारणात नवा अध्याय लिहीला असल्याचे शर्मा यांनी नमूद केले. मोदी सरकारने दिलेल्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच दिव्यांग खेळाडू आज विविध आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये नेत्रदिपक कामगिरी करत आहेत असेही ते म्हणाले.

एनडीए सरकार सत्तेत आल्यास दिव्यांगांच्या कल्याणासाठी झटणा-या नमो दिव्यांग अभियान भारतला ही त्यामुळे बळ मिळेल. दिव्यांग वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मानवी दृष्टीकोनातून अनेक प्रयत्न आणि उपाययोजना मोदी सरकारने केल्या आहेत आणि यापुढेही करतील हा विश्वास दिव्यांगवर्गाला आहे. मजबूत राष्ट्र निर्माणासाठी, दिव्यांगवर्गाच्या सशक्तीकरणासाठी दिव्यांग बंधुभगिनींनी अधिकाधिक संख्येंने घराबाहेर पडून महायुती आणि भाजपा-एनडीए च्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहनही शर्मा यांनी केले.

दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदान केंद्रावर पोहोचून त्यांना मतदान करणे सोपे व्हावे यासाठी निवडणूक आयोगासोबतच नमो दिव्यांग अभियान भारत चे सर्व कार्यकर्ते मदत करतील असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर अर्धनग्न अवस्थेत आमरण उपोषण करणार - बिजिया विष्णू मोहंती

Fri May 17 , 2024
नागपूर :- अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड तेलारा या रस्त्याचे काम विष्णू मोहंती यांनी पूर्ण केले. सदर रस्त्याचे काम सुधीर कंट्रक्शन या कंपनीला मिळाले होते. विष्णूचरण मोहंती यांना सब कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. त्यांनी संपूर्ण अटी नियमाचे पालन करून पूर्ण केला. त्या कामाची मोजणी, स्थळ, निरीक्षण, पंचनामा, अशा सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर कामाचे देयक दोन वर्षांपूर्वी टाकले होते आणि ते मंजूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com