संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
कामठी :- कोणत्याही देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्त्वाची असते .प्रत्येक श्रेय कामगारांच्या मेहनतीवर अवलंबून असते म्हणून जगातील सर्व कामगाराप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1 मे रोजी जागतिक कामगार दिन साजरा करण्यात येतो असे मत ऍड सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी वरील मनोगत व्यक्त केले.सुरुवातीला हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या प्रांगणात महाराष्ट् दिनानिमित्त ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कामगार नेते व माजी सांसद सदस्य दिवंगत दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून खंडेलवाल कंपनीत कामगारांसाठी न्याय हक्कासाठी लढा देणारा व सुप्रीम कोर्टापर्यंत कायदेशीर लढा देणारे व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले कामगार नेते लालसिंग यादव तसेच दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात अहोरात्र अविरत काम करणारे मुन्ना नागदेवें यांचे शाल , पुष्पगुच्छ व स्मूर्तीचिन्ह देऊन ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन हरदास प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक मनोज तातोडे यांनी केले,प्रास्ताविक हरदास विद्यालयाचे मुख्याध्यापक देवेंद्र जगताप यांनी केले तर आभार दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सागर भावे यांनी मानले.या कार्यक्रमात हरदास विद्यालय ,हरदास प्राथमिक शाळा,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल ,दादासाहेब कुंभारे विद्यालय,दादासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थी, शिक्षकंगण,कर्मचारीवृंद ,व धम्मसेवक,धम्मसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.